शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:41 IST

भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलीस दिलेल्या जबर धडकेत पिता जागीच ठार तर पुत्र जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली़

ठळक मुद्देमॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाला बोलेरोची धडक

लोहा : सोनखेड येथील बाजारहाट व खाजगी कामे आटोपून पिता-पुत्र मोटारसायकलने डेरला गावी जात असताना नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलीस दिलेल्या जबर धडकेत पिता जागीच ठार तर पुत्र जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली़लोहा तालुक्यातील डेरला येथील संभाजी गंगाराम सालकमवाड (वय ६०) व रामकिशन संभाजी सालकमवाड (३०) हे दोघे पिता-पुत्र बाजार व खाजगी कामानिमित्त सोनखेडला आले होते़ दोघेही पिता-पुत्र मोटारसायकल (एम़एच़ २६ ई- ९४१८) ने डेरला या गावी जाण्यासाठी निघाले असता मोटारसायकल नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक येताच नांदेड वरून लातूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. एम़एच़ २४, ८७९५) ने समोरून येणाºया मोटारसायकलीस जबर धडक दिली. धडकेने मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेले पिता संभाजी सालकमवाड उडून रस्त्यावर पडले असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर मुलगा रामकिशन सालकमवाड जखमी झाला.त्याच्यावर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सोनखेड ठाण्याचे सपोनि बालाजी बंडे, पोलीस नाईक प्रकाश साखरे, पोकॉ. गुरूनाथ कारामुंगे, राजेश मुंडे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र, सोनखेड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी सोनखेड पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाला बोलेरोची धडकराज्य महामार्गाच्या कडेने मॉर्निंग वॉकसाठी जात असताना पाठीमागून गाडीने दिलेल्या धडकेने कासराळीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत हायगले हे जागीच ठार झाले आहेत. हणमंत विठ्ठलराव हायगले हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे नरसी मार्गाकडे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना कासराळी आणि पाचपिंपळीदरम्यान नरसीकडेच जाणा-या (एमएच-२६-बीई २८६३) या बोलेरो पिकअप गाडीने हायगले यांना पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात हणमंत हायगले (वय ४५) हे जागीच ठार झाले. या रस्त्यादरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या हायगले यांच्या सहका-यांनी बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच हायगले गतप्राण झाले होते. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलरDeathमृत्यू