दुरूस्तीच्या कामांमुळे रेल्वेगाड्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:15 IST2019-04-06T00:15:11+5:302019-04-06T00:15:33+5:30

दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने हैदराबाद रेल्वे विभागीय कार्यालयाअंतर्गत रेल्वेपटरी देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़

Trains delay due to repair works | दुरूस्तीच्या कामांमुळे रेल्वेगाड्यांना विलंब

दुरूस्तीच्या कामांमुळे रेल्वेगाड्यांना विलंब

ठळक मुद्देदमरे : हैदराबाद विभागातील कामाचा परिणाम

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने हैदराबाद रेल्वे विभागीय कार्यालयाअंतर्गत रेल्वेपटरी देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्याचा परिणाम नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर झाला असून काही दिवसांपासून दमरेच्या बहुतांश गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात रेल्वेपटरी व परिसरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांमुळे या मार्गावर धावणाऱ्या बहुतांश गाड्या मागील आठ दिवसांपासून उशिराने धावत आहेत़ परिणामी गुरूवारी सिकंदराबाद- मुंबई- सीएसटी देवगिरी एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने धावली़
रेल्वे प्रशासनाकडून अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह रेल्वे ट्रॅकची देखभाल दुरूस्तीसह अन्य काम हाती घेतले आहे़ माकलीदुर्ग से डेवरापल्ली रेल्वेस्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ त्यामुळे विजयवाडा ते काजीपेटपर्यंतच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ सिकंदराबाद से फलमनुमा, उमदानगर, बोलाराम, मेदचलपर्यंत देखभाल दुरूस्तीचे काम सुरू आहे़ त्यामुळे नांदेड - हैदराबाद - नांदेड या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे़
गुरूवारी हैदराबाद - परभणी पॅसेंजर (५७५६३) आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा परभणी स्थानकावर पोहोचली़ त्यानंतर सदर गाडी परभणी-नांदेड पॅसेंजर म्हणून नांदेडला रवाना करण्यात आली़ सकाळी साडेनऊ वाजता निघणारी परभणी- नांदेड पॅसेंजर एक तास उशिराने रवाना झाली़
त्याचबरोबर काचिगडा- मनमाड पॅसेंजर (५७५६१) निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने तर सिकंदराबाद-मुंबई सीएसटी देवगिरी एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावली़ मागील तीन दिवसांपासून देवगिरी एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशिराने धावत आहे़

Web Title: Trains delay due to repair works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.