छत्रपती शिवरायांना अभिप्रेत समाजोपयोगी काम आजच्या युवकांनी करावे : निसार तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:33+5:302021-02-22T04:12:33+5:30

शिवजयंती निमित्ताने नवामोंढा नांदेड येथे सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या कार्यक्रमात उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. ...

Today's youth should do social work intended for Chhatrapati Shivaji: Nisar Tamboli | छत्रपती शिवरायांना अभिप्रेत समाजोपयोगी काम आजच्या युवकांनी करावे : निसार तांबोळी

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत समाजोपयोगी काम आजच्या युवकांनी करावे : निसार तांबोळी

शिवजयंती निमित्ताने नवामोंढा नांदेड येथे सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या कार्यक्रमात उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. मोहनअण्णा हंबर्डे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणीताई अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, सामजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे, प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक पाटील, सहायक आयुक्त एकनाथ पावडे, बाबा हरी सिंग, जुक्ताचे डी. बी. जांभरूणकर, छावा क्रांतिवीर संघटनेचे राजेश मोरे, कार्यकारी अभियंता इंजि. तानाजी हुसेकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, विवेक पाटील, मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. संजय कदम, आय. एम. ए.चे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. विद्या पाटील, मीनाक्षी जाधव पाटील, निमाचे डॉ. अविनाश हंबर्डे, नरेंद्र महाराज संप्रदाय समितीचे विश्वनाथ इंगळे पाटील, समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, स्वागताध्यक्ष धनंजय पाटील, प्रसिद्धीप्रमुख भागवत देवसरकर आदी उपस्थित होते.

हवामानतज्ज्ञ पंजाबराव डक पाटील यांनी उपस्थित मान्यवरांना शेतकऱ्यांच्या हवामान बदलाविषयी पिकावर होणारे परिणाम याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. अंकुश देवसरकर यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, कोरोना योद्धा नांदेडभूषण बाबा बलविंदर सिंग, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे, पद्मजा सिटीचे संचालक तथा स्थायी समितीचे सदस्य बालाजी जाधव, युवा उद्योजक संतोष हंबर्डे, उद्योजक राजू पारसेवार, हॅपी क्लब सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अलीम भाई, डॉ. बी. आर. आंबेडकर फाऊंडेशनचे संचालक बापुराव गजभारे, उद्योजक सुनील इंगळे, भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल देशमुख यांचा उपस्थितांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर पवार, पियुष शिंदे, रवी ढगे, डॉ. प्रशांत तावडे, प्रा. प्रभाकरराव जाधव, दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, विनायक चव्हाण, बालाजी इंगळे पाटील, प्रा. दिलीप शिरसाट, बालाजी शिरफुले, परमेश्वर काळे, वैभव कल्याणकर, विजय पाटील शिंदे, सुनील ताकतोडे, संतोष पाटील उमरेकर, मोतीराम पवार, ज्ञानोबा गायकवाड, पांडुरंग पोपळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. मुरलीधर हंबर्डे, रवी ढगे, भागवत देवसरकर यांनी केले. स्वागताध्यक्ष धनंजय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Today's youth should do social work intended for Chhatrapati Shivaji: Nisar Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.