शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नांदेड लोकसभेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:16 AM

राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्देचला मतदान करुया मतदानासाठी ११ हजार १५५ कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती

नांदेड : राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानप्रक्रियेसाठी प्रशासकीय व्यवस्थेसह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दली.नांदेड लोकसभेसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रांवरुन सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार असून मतदानासाठी २ हजार २८ मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ११ हजार १५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये ८५- भोकर मतदान केंद्र संख्या - ३२९, ८६-नांदेड उत्तर - मतदान केंद्र संख्या ३४६, ८७- नांदेड दक्षिण मतदान केंद्र संख्या -३२४, ८९- नायगाव खै. मतदान केंद्र संख्या -३४२, ९०- देगलूर मतदान केंद्र संख्या -३४६, ९१- मुखेड विधानसभा मतदारसंघात ३४१ मतदान केंदे्र राहणार आहेत.जिल्ह्यात ३१ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव बदलण्यात आले असून एका मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. याशिवाय ३६ मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्रे जोडण्यात आली आहेत.जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्यविषयक सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तगडा पोलीस बंदोबस्तमतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ५ हजार ६६५ पोलीस अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी -१५, पोलीस निरीक्षक व साहाय्यक पोलीस निरीक्षक -२२२, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक-११०, पोलीस कर्मचारी -४ हजार ३ , होमगार्ड-१ हजार ३१२ असे एकूण ५ हजार ६६५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच एसआरपीएफच्या सहा कंपन्या, एसएपी एक कंपनी, क्यूआरटी चार सेक्शन, आरसीपी चार सेक्शन असा तगडा पोलीस बंदोबस्त आहे़सहा विधानसभांमध्ये सहा सखी मतदान केंद्रनांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. केवळ महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेले सखी मतदान केंद्र आणि सर्व प्रकारच्या सुविधा असणारे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. भोकरमध्ये मौलाना आझाद विद्यालय (मुदखेड), नांदेड-उत्तरमध्ये महिला कामगार कल्याण मंडळ (लेबर कॉलनी, नांदेड), नांदेड दक्षिण गुजराती हायस्कूल वजिराबाद, नायगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, देगलूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय, मुखेडमध्ये गुरुदेव प्राथमिक शाळा, सहा मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आली आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी सहाय्यक आणि शिपाई असे म्हणजेच सर्व कर्मचारी महिला राहणार आहेत़दिव्यांगांसाठी आॅटोची व्यवस्थादिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी मतदान केंद्रनिहाय आॅॅटोची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या मतदार यादीतील पत्त्याच्या ठिकाणापासून ते मतदान केंद्रावर जाण्यासाठी स्वतंत्र आॅटोची व्यवस्था असेल. ज्या मतदारांनी आपली दिव्यांग म्हणून नोंद केली होती, त्यांच्या पोलचिटच्या पाठीमागे संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. दिव्यांग मतदारांनी त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या भागातील आॅॅटो मतदान करायला दिव्यांग मतदाराला घेऊन जाऊन परत आणून सोडेल, अशी व्यवस्थाही प्रथमच नांदेड लोकसभा मतदारसंघात करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ