वेगवेगळ्या अपघातांत दोन युवकांसह तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:20 IST2021-02-24T04:20:00+5:302021-02-24T04:20:00+5:30
भोकर-नांदेड रस्त्यावर सीताखंडी घाटात दुचाकीवरून जात असलेल्या उमरखेड तालुक्यातील साखरा येथील कपिल पांडुरंग दवणे हा युवक टेम्पोच्या धडकेत ठार ...

वेगवेगळ्या अपघातांत दोन युवकांसह तिघांचा मृत्यू
भोकर-नांदेड रस्त्यावर सीताखंडी घाटात दुचाकीवरून जात असलेल्या उमरखेड तालुक्यातील साखरा येथील कपिल पांडुरंग दवणे हा युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. एम.एच.२६-एएफ ०६२८ क्रमांकाच्या टेम्पोने दवणेच्या एम.एच.२९-बीएस २२९९ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला. याप्रकरणी गोविंद दवणे यांच्या तक्रारीवरुन भोकर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अन्य एका घटनेत मुखेड तालुक्यातील जांब येथे रविवारी एम.एच.१६- सीएस ४२१५ क्रमांकाच्या दुचाकीवरून जांब ते मुखेड रस्त्याने मरवाळी तांडा येथे जात असणाऱ्या विशाल श्रीपत जाधव (वय २१)या युवकाच्या दुचाकीने एपी१०-टी- ७४४६ क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यात विशाल जाधव हा ठार झाला. या प्रकरणी वैभव निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.