ऑनलाईन अपहार प्रकरणात तीन विदेशी नागरिक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:31+5:302021-02-05T06:10:31+5:30

नांदेड - शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे तब्बल साडेचौदा कोटी रुपये लांबविण्यात आले होते. ...

Three foreign nationals arrested in online embezzlement case | ऑनलाईन अपहार प्रकरणात तीन विदेशी नागरिक गजाआड

ऑनलाईन अपहार प्रकरणात तीन विदेशी नागरिक गजाआड

नांदेड - शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे तब्बल साडेचौदा कोटी रुपये लांबविण्यात आले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. त्यातील दोघेजण युगांडाचे तर एक केनियाचा रहिवासी आहे. शंकर नागरी सहकारी बँकेचे साडेचौदा कोटी रुपये आयडीबीआयचे खाते हॅक करुन लंपास करण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली. त्यासाठी मुंबई येथून सायबरमधील तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रुमानिका रोनॉल्ड पी. किटासिबवा (२२, रा. म्परवे कम्पका, युगांडा), आयव्ही मोनुके केनेडी नयबुतो (२४, रा. महाली आयसीपो, केनिया), गलाबुजी मुकीसा रॉबर्ट फेड (२३, रा. बुसुकुमा किर्वेडा, गयाला रोड, युगांडा) आणि प्रिया गोविंदअप्पा सावनूर (रा. केशवपूर, हुबळी) या चार आरोपींना धारवाड येथून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन लॅपटॉप, ६ मोबाईल, २ डोंगल, ८ चेकबुक, ५ पासबुक, १३ डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेने केनिया येथील एकाला याच प्रकरणात अटक केली होती. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखीही आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे.

चौकट - अनेक राज्य काढली पिंजून

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील नाईक, संतोष शेकडे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल गुंडेराव करले, गंगाधर कदम, अफजल पठाण, पोलीस काॅन्स्टेबल देवासिंग चव्हाण, महिला कॉन्स्टेबल पवार, गोरे यांच्या पथकाने अनेक राज्ये पिंजून काढली. अखेरीस कर्नाटक राज्यातील धारवाड येथे आरोपी त्यांच्या तावडीत सापडले.

Web Title: Three foreign nationals arrested in online embezzlement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.