जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:20+5:302021-02-05T06:10:20+5:30
एअरटेल टॉवरची बॅटरी चोरीला नांदेड- भोकर शहरात उमरी रस्त्यावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरची बॅटरी चोरट्याने लंपास केली. ही घटना ...

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला
एअरटेल टॉवरची बॅटरी चोरीला
नांदेड- भोकर शहरात उमरी रस्त्यावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरची बॅटरी चोरट्याने लंपास केली. ही घटना २९ जानेवारी रोजी घडली. चोरट्याने टॉवर रुममधील लोखंडी पट्टी वाकवून ३४ हजारांच्या बॅटऱ्या लांबविल्या. या प्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बसस्थानकासमोरील जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड- बारड बसस्थानकासमोर सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. ३० जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. एका हॉटेलच्यासमोर कल्याण व टाईम बाजार नावाचा मटका सुरु होता. यावेळी पोलिसांनी तीन हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात बारड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
धाब्यावरुन अवैधपणे दारुची विक्री
नांदेड- ढाकणी शिवारात शिव स्वराज्य धाब्यावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली साडेतीन हजार रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. ३० जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सपोनि महादेव मांजरमकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.