छेडखानीच्या आरोपावरुन तरुणाची काढली धिंड

By Admin | Updated: March 5, 2017 21:09 IST2017-03-05T21:09:28+5:302017-03-05T21:09:28+5:30

जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळे

Threats from youth | छेडखानीच्या आरोपावरुन तरुणाची काढली धिंड

छेडखानीच्या आरोपावरुन तरुणाची काढली धिंड

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि.5 - अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासून गावभर वाजत-गाजत धिंड काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या गंभीर घटनेची मात्र अर्धापूर पोलिसात आतापर्यंत अदखलपात्र अशीच नोंद असून घटनेनंतर तरुण बेपत्ता झाला असून ठाण्यात छेडछाडीची मात्र कुठलीही तक्रार नाही़
जनरल स्टोअर्स चालविणाऱ्या एका तरुणाने मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत गावातीलच काही जणांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली़ त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले़ गळ्यात अन् डोक्यावर चपलांच्या माळा घालून मारहाण करीतच त्याची गावभर धिंड काढण्यात आली़ मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेला तरुणाच्या समोर बँडही वाजविण्यात येत होता़ जवळपास दोनशे ते तीनशे जणांचा हा गट त्या तरुणाला मारहाण करीत गावभर फिरवित असताना, पोलिसांनी मात्र यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही हे विशेष़ त्यानंतर तरुणाला मारहाण करीतच ठाण्यात नेण्यात आले़
या ठिकाणी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला़ सदरील घटनेनंतर मात्र तो तरुण बेपत्ता झाला आहे़ त्याच्या कुटुंबियांनेही गाव सोडले आहे़ संबंधित घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ याबाबत अर्धापूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र या प्रकाराबाबत अद्याप माझ्याकडे कोणतीही माहिती आली नसून या संदर्भात अर्धापूर पोलिस निरिक्षकांना विचारतो अशी प्रतिक्रिया दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: Threats from youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.