शाळेसमोरुन चोरट्याने दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:58+5:302021-05-29T04:14:58+5:30
शहरातील वजिराबाद भागात एका तरुणाची नजर चुकवून २६ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना २७ मे ...

शाळेसमोरुन चोरट्याने दुचाकी लांबविली
शहरातील वजिराबाद भागात एका तरुणाची नजर चुकवून २६ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना २७ मे रोजी घडली. विरभद्र अशोकराव साखरे असे तरुणाचे नाव आहे. तो काटगर वॉच सेंटर येथे थांबलेला होता. यावेळी त्याच्या खिशातील मोबाईल लांबविण्यात आला. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
रसवंती चालकाचे पैसे चोरीला
भोकर ते म्हैसा जाणाऱ्या रस्त्यावर रसवंती चालकाच्या गल्ल्यातील १६ हजार रुपये चोरट्याने लांबविले. ही घटना २७ मे रोजी घडली. गोविंद साईनाथ हानमानगे हे रसवंती चालवितात. २७ मे रोजी ग्लास ठेवण्याचा बहाणा करुन आरोपीने त्यांच्या गल्ल्यातील १६ हजार रुपये काढून घेतले. थोड्या वेळानंतर ही बाब लक्षात आली. या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.