शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शेती होती, कष्ट होते; पण नशिबाने दिला दगा; आर्थिक विवंचनेतून लखे कुटुंबाची करुण एक्झिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:42 IST

दगडालाही पाझर फुटेल अशी शोकांतिका! २५ वर्षे वडिलांची शुश्रूषा केली, पण गरिबीपुढे हात टेकले; एकाच कुटुंबातील चौघांचा शेवट

- नामदेव बिचेवारबारड : दुर्धर आजार असलेल्या वडिलांवर लाखोंचा खर्च. २५ वर्षांपासून जागचे हलूही न शकणाऱ्या वडिलांची शुश्रूषा करणारी दोन्ही भावंडं. शेती होती, ती कसण्यासाठीचे कष्टही होते. परंतु वारंवार नशिबाने दगा दिल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना जवळा मुरार येथे घडली. या घटनेचे गूढ अद्याप उकलले नाही. परंतु शिकायला असलेल्या बहिणीच्या मुलाला दोन दिवसांपूर्वीच या कुटुंबाने परत पाठविले होते, तर वृद्ध आई-वडिलांचे मृतदेह घरात खाटेवर असताना बाहेरून मात्र दरवाजाला कडी लावली होती. त्यामुळे ही घटना सुनियोजित असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मयत रमेश व्हणाजी लखे हे पिढीजात जवळा मुरार गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रमेशराव यांना २६ वर्षांपासून अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावर लाखोंचा खर्च झाला. परंतु शस्त्रक्रियेनंतरही अनेक वर्ष हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत होते. त्यातून या कष्टकरी कुटुंबाची आर्थिक ओढाताण सुरू होती. परिणामी पदरी असलेल्या चार एकरपैकी एक एकर जमीन बारा वर्षांपूर्वीच विकावी लागली. राहिलेली साडेतीन एकर बटाईने दिली होती. परंतु दोन वर्षापासून मुलगा उमेश आणि बजरंग हे शेती कसत होते. परंतु शेतीत वारंवार नापिकी येत होती. कुटुंबावरील कर्जाचा डोंगरही वाढतच होता.

मोठा मुलगा उमेश हा चार वर्षांपासून गावात डेकोरेशनचे काम करत होता. तसेच एका एजन्सीवर अर्धवेळ कामाला जात होता. सामाजिक कार्यात असलेला उमेश हा मनसेत सक्रिय होता, तर बजरंग हापण दोन वर्षांपासून नांदेडच्या एका कटलरी दुकानात काम करायचा. दररोजचा येण्या-जाण्याचा खर्च जाता हाती फारसे पडत नव्हते. तरीपण कुटुंबाचा गाडा जिद्दीने हाकत वृद्ध आई-वडिलांचे आजारपणही करीत होते. दोघेही अविवाहित होते. मुलाच्या लग्नापूर्वी पक्के घर असावे म्हणून घरकुलासाठी ग्रामपंचायतकडे प्रस्तावही दाखल केला होता. मार्च महिन्यात त्यांच्या घरकुलाचे कामही सुरू होणार होते, अशी माहिती सरपंच रमेश लखे यांनी दिली.

गावात शिवस्मारकाचे काम सुरू आहे आणि त्या कामासाठी डेकोरेशन चांगले करायचे आहे, याबाबत उमेशला दोन दिवसांपूर्वीच बोललो होतो. अशी आठवणही लखे यांनी सांगितली. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून हे कुटुंब काही तरी काळजीत असल्याचे जाणवत होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. परंतु एवढी धक्कादायक घटना घडेल याचा मात्र कुणालाही अंदाज आला नव्हता. कष्टकरी कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याच्या घटनेमुळे समाजमन मात्र सुन्न झाले आहे.

दरवाजाला बाहेरून कडी; आत दोघांचे मृतदेहवृद्ध जोडप्याचे मृतदेह घरात खाटेवर पडलेले होते, तर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. या दोघांचाही गळा दाबून किंवा फाशी देऊन खून केल्यानंतर दोन्ही मुलांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण दोन्ही मुले घराच्या दरवाजाची कडी लावून मुगट स्टेशनकडे जात असल्याचे सरेगाव येथील एका शेतकऱ्याने पाहिले आहे. मुगट स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोघांनीही स्वत:ला रेल्वेपुढे झोकून दिल्याचे कैद झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, उलगडा लवकरच होणार असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी सांगितले.

भावकीने उपचारासाठी केली होती वर्गणी गोळारमेश लखे यांच्या उपचारासाठीचा खर्च करताना लखे कुटुंबीय हवालदिल झाले होते. कितीही कष्ट उपसले तरी येणारी संकटे मात्र थांबायची नाव घेत नव्हती. त्यात काही दिवसांपूर्वीच लखे यांच्या उपचारासाठी भावकीतील मंडळींनी वर्गणी करून ४० हजार रुपये जमविले होते. त्यानंतर हैदराबाद येथे ते उपचारासाठी गेले होते. परंतु किती दिवस भावकी आणि ग्रामस्थांकडे हात पसरायचे अशी विवंचनेत हे कुटुंब सापडले होते.

हाती पडेल ते काम केले; पण शुक्लकाष्ठ संपेनाउमेश आणि बजरंग या दोन्ही भावांनी वडिलांचा आजार आणि कुटुंब चालविण्यासाठी हाती पडेल ते काम केले. सोबतच शेतीकडेही लक्ष दिले. परंतु त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ मात्र संपायचे नाव घेत नव्हते. त्यामुळेच दोन्ही भावांनी आई-वडिलांना संपवून स्वत: आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Debt-ridden Maharashtra family of four dies by suicide after hardship.

Web Summary : Financial struggles and a father's illness led a family in Jawala Murar to a tragic end. Mounting debt and crop failure pushed the two sons to take their parents' lives and then their own, leaving the village in shock.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड