महात्मा बसवण्णांनंतर कोणीही जगद्गुरू नाही : अरविंद जत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:19 IST2020-03-02T14:18:53+5:302020-03-02T14:19:55+5:30
बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़

महात्मा बसवण्णांनंतर कोणीही जगद्गुरू नाही : अरविंद जत्ती
नांदेड : फक्त जातीने, धर्माने लिंगायत असून चालत नाही तर आपल्या कर्माने आणि आचरणाने लिंगायत असण्याची गरज आहे़ ईश्वराचे प्रतीक असलेल्या इष्टलिंगाला जो आयात करतो तोच लिंगायत होईल. तसेच विश्वगुरू महात्मा बसवण्णा हेच या जगताचे गुरू आहेत़ त्यांच्यानंतर कोणीही जगद्गुरु होऊ शकत नाही़ आपण फक्त त्यांचे कार्य, विचारांचा प्रसार करू शकतो, असे प्रतिपादन चिंतन बैठकीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी केले़
नांदेड येथील अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती चिंतन बैठकीत ते बोलत होते़ रविवारी बैठकीचे उद्घाटन कुलगुरु डॉ़ उद्धव भोसले यांनी केले़ यावेळी बसव मंच समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चन्नबसवानंद महास्वामी, डॉ. व्ही़ एस. शेटे, बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, माधवराव पाटील टाकळीकर, माधवराव पंडागळे, अशोक मुस्तापुरे, नरेश दरगू, विनोद कांचनगिरे, आनंद कर्णे उपस्थित होते.
चन्नबसवानंद महास्वामी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
‘जनगणनेत धर्माचा उल्लेख करा’
बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़ या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील प्रतिनिधी उपस्थित होते. ़
अध्ययन केंद्र सुरू करणार
कुलगुरु डॉ़ उद्धव भोसले म्हणाले, चिंतन शिबिराचा फायदा समाजातील सर्वच घटकांना व्हावा, यासाठी प्रयत्न करावे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार व साहित्य समाजासाठी अतिशय उपयुक्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात लवकरच महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र सुरू करणार आहे. यासाठीच सर्व प्रशासकीय ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.