'...तर छावा संघटना तलवार घेऊन नरधमाचे हात छाटतील': नानासाहेब जावळे
By शिवराज बिचेवार | Updated: June 27, 2023 18:39 IST2023-06-27T18:39:08+5:302023-06-27T18:39:30+5:30
दारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली, शिवाय अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत.

'...तर छावा संघटना तलवार घेऊन नरधमाचे हात छाटतील': नानासाहेब जावळे
नांदेड- जिल्हयातील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचाराची घटना घडली .. आरोपीला पोलीसांनी अटक केली. या घटनेचा आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून निषेध करण्यात आला असून पीडितेला आथिर्क मदत आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी छावाचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी केली.
दरम्यान कठोर कायदे असूनही अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होत नसेल तर पुढील काळात अश्या नराधमांची हात आम्ही तलवारीने छाटु आणि याला जबाबदार सरकार असेल असा इशारा नाना साहेब जावळे पाटील यांनी दिला.
राज्यात दारूबंदी करा
दारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली, शिवाय अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. त्यामूळे शिंदे सरकारने राज्यात दारू बंदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी केली