शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्याचा मोह जिवावर बेतला, खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:36 IST

गारगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आहे आणि त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले गेले आहे.

- सुनील चौरे

हदगाव: तालुक्यातील वरवट येथे आई आणि दोन चिमुकल्या पुरात बुडून मरण पावल्याची घटना ताजी असतानाच, आज दुपारी गारगव्हाण येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गारगव्हाण शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (२९ मे) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

निखील कुंडलिक वाढवे (वय १५, रा. गारगव्हाण) आणि संघर्ष बाळु पडघणे (वय १७, रा. नेवरी) अशी मृतांची नावे आहेत. संघर्ष आपल्या मामाच्या घरी गारगव्हाण येथे आलेला होता, गावात एका लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे तो काही दिवसासाठी येथे थांबला होता. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या संघर्षने ७० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने त्याच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकला नाही.

गारगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आहे आणि त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले गेले आहे. यामुळे तयार झालेल्या खदानी पावसाळ्यात पाण्याने भरून जातात. काल (२८ मे) अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे खदानी पूर्णपणे पाण्याने भरली होती. पाणी पाहून निखील आणि संघर्ष यांना पोहण्याचा मोह झाला. मात्र, खदानीतील पाण्याची खोली आणि धोका याचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु केलं आणि दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केलं.

या दुर्दैवी घटनेने गारगव्हाण आणि नेवरी या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अशा ठिकाणी पोहण्यापासून परावृत्त राहण्याचं आवाहन केलं असून, पावसाळ्यापूर्वी अशा खदानींची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू