- यशवंत परांडकरनांदेड : निसर्गाची अनोखी किमया जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाहायला मिळत आहे. सुमारे चार हजार किलोमीटरचा लांबचा प्रवास करून ‘निळा कस्तूर’ (Blue Rock Thrush) हा विदेशी पक्षी कंधार तालुक्यातील पानभोसी परिसरात थव्याने दाखल झाला आहे. या भागात प्रथमच या पक्ष्यांची संख्या ४० ते ५० च्या आसपास दिसून येत असल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मूळचा दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील रहिवासी असलेला हा पक्षी थंडीच्या काळात अन्नाच्या शोधात भारतात येतो. परंतु यंदा येण्यास यास उशीर झाला आहे, असे दिसते. या दिवसात प्रामुख्याने नर पक्षी आघाडीवर असतात. मात्र पानभोसी परिसरात यावेळेस नर पक्ष्यासोबत काही प्रमाणात मादी पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात निर्माण झालेला गारवा या पक्ष्यांना आकर्षित करत आहे, असे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.
‘डोंगराचा गायक’ म्हणून ओळखउंच खडकावर बसून मैनेसारखा मधुर आवाज काढत असल्याने या पक्ष्याला ‘डोंगराचा गायक’ म्हणून ओळखले जाते. यातील नर पक्षी निळसर-राखाडी रंगाचा असून, त्याचे शरीर अतिशय आकर्षक आहे तर मादी फिकट तपकिरी रंगाची आहे. २१ ते २३ सेमी आकार आणि ३७ ते ७० ग्रॅम वजन असलेला हा पक्षी दिसायला बुलबुलसारखा भासतो.
शांत वातावरणात राहतोनिळ्या कस्तूरला मानवी वस्तीपेक्षा डोंगर, कडे, जुन्या इमारती आणि किल्ले अशा शांत व सुरक्षित जागा अधिक आवडतात. पानभोसीच्या डोंगराळ भागात या पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याने त्यांनी येथे मुक्काम ठोकला आहे. हा पक्षी पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानला जातो. कीटक, अळ्या, कोळी आणि लहान सरडे हे त्यांचे मुख्य अन्न असून, विविध बिया आणि फळेही हा पक्षी खाऊ लागला आहे.
ऊन वाढल्यास हे पक्षी मायदेशी परतणारएप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढतो. अधिक ऊन पडण्यापूर्वी हे परदेशी पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी म्हणजे युरोपच्या थंड प्रदेशाकडे जातील. भारतीय वातावरण आणि सध्याचा थोडासा गारवा या पक्ष्यांना पोषक असल्याने ते भारतात आले असावेत. हा शांत आणि पर्यावरणपूरक पक्षी असून, जैवविविधतेच्या दृष्टीने त्याचे आगमन महत्त्वाचे आहे. पक्षप्रेमी या परदेशी पाहुण्याला मोबाइलमध्ये कैद करताना दिसत आहेत, असे पक्षीमित्र शिवसांब घोडके यांनी सांगितले.
Web Summary : The Blue Rock Thrush from Europe has arrived in Nanded, Maharashtra. These birds, known as 'Mountain Singers', have been spotted in the Panbhosi area. Around 40-50 have been seen, likely drawn by cooler temperatures after heavy rains. They will return to Europe before the summer heat.
Web Summary : यूरोप से नीली कस्तूर पक्षी महाराष्ट्र के नांदेड़ जिले में पहुंचे। 'डोंगराचा गायक' के रूप में पहचाने जाने वाले ये पक्षी पानभोसी क्षेत्र में देखे गए हैं। भारी बारिश के बाद ठंडे तापमान के कारण लगभग 40-50 पक्षी दिखाई दिए हैं। वे गर्मी से पहले यूरोप लौट जाएंगे।