शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच चार वर्षीय पोराला पोत्यात बांधून फेकले नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 10:36 IST

नांदेडमधील घटना; अनैतिक संबंधातून मूल जन्माला आल्याचा होता संशय; मुलाचा मृतदेहच लागला हाती

लोकमत न्यूज नेटवर्क   कंधार (जि. नांदेड) : पत्नीच्या अनैतिक संबंधातून मूल जन्माला आले, असा संशय पित्याला होता. यातूनच त्याने चार वर्षीय मुलाला पोत्यात बांधून गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.    माधवराव देव्हारे  असे आरोपीचे नाव असून, अभिषेक देव्हारे असे मृताचे नाव आहे. २८ मार्चला अभिषेक  शाळेतून घरी परत न आल्याने २९ रोजी आई व नातेवाइकांनी कंधार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पडवळ, उपनिरीक्षक ईंद्राळे, आदी नारनाळी (ता. कंधार) येथे पोहोचले व त्यांनी चौकशी केली. चौकशीत माधव हा उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.    

आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. तो दारूच्या नशेत पत्नीसोबत नेहमी भांडण करायचा. पत्नीवरील संशयातून तो नेहमीच लहान मुलगा माझा नाही, असे सांगायचा. २८ रोजी मुलगा अभिषेकला  पोत्यात बांधून त्याने नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास केला असता  ३० मार्चला अभिषेकचा मृतदेह धर्माबाद तालुक्यातील येलापूर शिवारात गोदावरी नदी काठावर पोत्यात बांधलेला पाण्यावर तरंगताना आढळला.  पोलिसांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आरोपी माधव देव्हारे यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस