पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

By प्रसाद आर्वीकर | Updated: July 7, 2023 16:46 IST2023-07-07T16:45:36+5:302023-07-07T16:46:15+5:30

शिकारा गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात गेले होते वाहून

The body of the person swept away by the flood was found two days later | पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

- शेखर पाटील
मुखेड (जि नांदेड) :
ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी ७ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आढळला आहे.

सुरेश गोविंद वाघमारे (४५)  असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सुरेश वाघमारे हे मूळचे शिकारा येथील रहिवासी असून, दररोज मुखेड येथे कामानिमित्त येतात. ५ जुलै रोजी त्यांनी दिवसभर मुखेड शहरात काम केले. त्यानंतर दुपारी तीन वाजता गावाकडे परत जाण्यासाठी निघाले. ५ जुलै रोजी मुखेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे शिकारा गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला होता. हा ओढा ओलांडून जात असताना सुरेश वाघमारे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.

दरम्यान सुरेश वाघमारे हे मुखेड येथेच थांबले असावेत, या समजून नातेवाईकांनीही त्यांचा शोध घेतला नाही; परंतु ते दुसऱ्या दिवशीही परत आले नाहीत. त्यामुळे शोध सुरू करण्यात आला. ७ जुलै रोजी सकाळी एका तळ्यामध्ये सुरेश वाघमारे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: The body of the person swept away by the flood was found two days later