नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
By मनोज शेलार | Updated: September 19, 2024 17:50 IST2024-09-19T17:49:01+5:302024-09-19T17:50:20+5:30
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे...

नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
नंदुरबार - एका धार्मिक रॅलीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर, नंदुरबारमधील माळीवाडा, इलाही चौक आणि मच्छी बाजार परिसरात तुफान दगडफेक झाली. यावेळी, उपद्रव्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह खाजगी वाहनांचीही तोडफोड केली. एवढेच नाही, तर तीन घरे आणि तीन दूचाकीना आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. घटनेचा परिणाम शहरातील इतर भागांतही झाल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर अफवा पसल्या आणि नागरिकांचीही धावपळ उडाली. यामुळे दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाली, शाळा देखील सोडण्यात आल्या. परिणामी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.
तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.