बलात्कार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:51 IST2018-10-07T00:51:32+5:302018-10-07T00:51:48+5:30
एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली.

बलात्कार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाचा कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली.
हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम येथील एक अल्पवयीन मुलगी हिमायतनगर येथील शाळेत दहावीच्या परिक्षेला गेली होती. तेव्हा दि. ५ मार्च २०१६ रोजी यातील आरोपी राम उर्फ अविनाश धावजी राठोड (वय२६) रा. दरेसरसम याने मुलीला शाळेच्या पाठीमागे बोलावून घेतले. तेथे लग्नाचे अमिष दाखवून अँटोरिक्षाने हदगाव, परभणी आणि तेथून चारचाकी वाहनाने पनवेल येथे नेले. याठिकाणी असलेल्या मित्राच्या रूमवर नेवुन जबरदस्तीने अनेक वेळा अत्याचार केले. दि ८मार्च२०१६ ला पोलिसांनी पनवेल येथे आरोपी आणि पिडीत मुलीस ताब्यात घेतले. हिमायतनगर पोलिसात आरोपीविरुद्ध ग्.र.न.३९/१६ कलम ३६६, ३७६, कलम(४) बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी योगेशकुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास करून १२ मे२०१६ रोजी भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या खटल्यात ९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.
अल्पवयीन मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी राम उर्फ अविनाश राठोड याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार दंड तर दंडातील २५हजार रुपये पिडीत मुलीस देण्याचा निकाल न्यायाधीश एम.एस.शेख यांनी दिला. सरकारी अभियोक्ता अँड. एस.आर. कस्तुरे यांनी काम पाहिले.