जिल्ह्यात दहा कोरोनाबाधित तर २० रुग्णांना सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:26+5:302021-02-05T06:11:26+5:30
नांदेड - जिल्ह्यात रविवारी दहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर २० रुग्णांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील ...

जिल्ह्यात दहा कोरोनाबाधित तर २० रुग्णांना सुट्टी
नांदेड - जिल्ह्यात रविवारी दहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर २० रुग्णांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २२ हजार २६४वर पोहोचली असून, बरे होणाऱ्यांची संख्या २१ हजार १५९ इतकी आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ५८२ जणांचा मृत्यूही झाला आहे. रविवारी जिल्ह्यात १ हजार ७७२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार ७४८ अहवाल निगेटिव्ह तर १० अहवाल पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर तपासणीत किनवटमध्ये १ तर परभणी येथे १ आणि ॲन्टिजेन तपासणीत मनपा क्षेत्रात ७ तर नांदेड ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात ३२० रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी २० कोरोनाबाधितांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यात मनपा अंतर्गत ७, विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २, माहूर १, मुखेड २, जिल्हा रुग्णालय ४ आणि खासगी रुग्णालयातील चौघांचा समावेश आहे.
जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या ३२० रुग्णांपैकी मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात १८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यांतर्गत ३९, विष्णूपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत १६, मुखेड १२, महसूल भवन कोविड सेंटर ८, किनवट २, देगलूर ४ आणि खासगी रुग्णालयात १८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.०३ टक्के इतके झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६६ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ८१ खाटा कोरोना रुग्णांसाठी शिल्लक आहेत.