माहूर गडावरील दत्त जयंतीनिमित्त मंदिर राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:57+5:302020-12-29T04:16:57+5:30

प्रतिवर्षी माहूर गड येथे दत्त जयंती यात्रा उत्सवासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात. मात्र सध्या ...

The temple on Mahur fort will remain closed on the occasion of Datta Jayanti | माहूर गडावरील दत्त जयंतीनिमित्त मंदिर राहणार बंद

माहूर गडावरील दत्त जयंतीनिमित्त मंदिर राहणार बंद

प्रतिवर्षी माहूर गड येथे दत्त जयंती यात्रा उत्सवासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात. मात्र सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून माहूर गड येथील दत्त शिखर संस्थानने यावर्षी दत्त जयंती सोहळा अगदी साधेपणाने मंदिर परिसरात विधिवत पद्धतीने साजरा होणार असून या दत्त जयंती सोहळ्यात भाविकांनी मंदिर परिसरात न येता घरी राहूनच हा सोहळा साजरा करावा व या दरम्यान मंदिर परिसरात कोणीही गर्दी करू नये असे आवाहन श्री दत्त शिखर संस्थानचे अध्यक्ष महंत मधुसूदन भारती गुरू अच्युत भारती यांनी सर्व दत्त भक्तांना केले आहे.

माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे श्री दत्त प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गडावर हजेरी लावून पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन परतत आहेत.

Web Title: The temple on Mahur fort will remain closed on the occasion of Datta Jayanti