शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

शिक्षक, मुख्याध्यापकांच्या प्रयोगशीलतेने रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:37 IST

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे.

ठळक मुद्देआदिवासीबहुल गाव लघुशंकागृह, पोषण आहाराकडेही दिले जाते विशेष लक्ष

नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी भागात तालुका मुख्यालयापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेली दहेगाव येथील ज्ञानरचनावादी, प्रयोगशील जि. प. ची प्राथमिक शाळा एखाद्या खाजगी संस्थेच्या शाळेलाही लाजवणारी शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिकास येत आहे.८५० लोकसंख्या व ६०० मतदार असलेल्या दहेगावात आदिवासी समाजाचे १०० टक्के वास्तव्य आहे. शाळेची स्थापना १९६६ मध्ये झाली असून सुरुवातीपासूनच शाळेला ग्रामस्थांनी भरघोस पाठिंबा देत शिक्षणाची कास धरल्याने येथे कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांचाही आनंद द्विगुणित झाला आहे. किंबहुना त्यामुळेच शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची परंपरा आजतागायत कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शासनाचे नवे उपक्रम सुरु होत असताना या शाळेने त्यातही पुढाकार घेतला आहे़ त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी शासनाच्या विविध विभागात शासकीय पदावर कार्यरत आहेत. या शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग असून स्वतंत्र वर्गखोल्या विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लघुशंकागृह, शालेय पोषण आहारासाठी उत्कृष्ट स्वयंपाकगृह आहेत. तसेच या शाळेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून बालपणापासून वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, या उद्देशाने तब्बल ३५० एकापेक्षा एक सरस पुस्तके या शाळेच्या वाचनालयात उपलब्ध आहेत.सदरील शाळा ही संपूर्ण डिजिटल शाळा बनली असून पाल्यांना खाजगी शाळेत न घालता याच शाळेत घालण्यासाठी पालक उत्सुक असल्याचे चित्र आहे.विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणमाहूर तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात असलेले दहेगाव १०० टक्के आदिवासी गाव आहे़ पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थितीही १०० टक्के असते़ या ठिकाणच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबविले़

उपक्रमशील व कल्पकवृत्तीचे अध्यापनाचे व्रत अंगीकारलेली शिक्षक मंडळी लाभल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे़ दुर्गम व डोंगरी आदिवासी गावात सेवाभावी वृत्तीने कर्तव्य बजावतात़- वाय़टी़ राजारुपे, मुख्याध्यापक

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी