टँकरचालकाला लुटणाऱ्यांना सात दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:58+5:302021-02-05T06:09:58+5:30
नांदेड - दुधाचा टँकर घेऊन जाणाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याजवळील पावणे तीन लाख रुपये असलेली बॅग पळविण्यात आली होती. ...

टँकरचालकाला लुटणाऱ्यांना सात दिवसांची कोठडी
नांदेड - दुधाचा टँकर घेऊन जाणाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याजवळील पावणे तीन लाख रुपये असलेली बॅग पळविण्यात आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लहू लांडगे हे नॅचरल दूध कंपनीचा टँकर घेऊन चालले असताना पद्मजा सिटीसमोर दुचाकी आडवी लावून लांडगे यांना बंदुकीचा धाक दाखविण्यात आला होता. यावेळी आरोपींनी लांडगे यांच्याजवळील पावणे तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात बलप्रितसिंघ नानकसिंघ सपुरे, प्रतापसिंघ सिरपल्लीवाले, रोहितसिंघ सहानी आणि हरपालसिंघ बोरगाववाले या चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने चौघांनाही सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.