हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST2020-12-26T04:15:16+5:302020-12-26T04:15:16+5:30
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध निवडणूक कक्षाची एकूण १८ पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी ९९ ...

हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध निवडणूक कक्षाची एकूण १८ पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी ९९ ते ११० असून झोनल अधिकारी २९ यांचे आदेश पारित करण्यात आले आहेत. सदरील १०८ ग्रामपंचायतीच्या एकूण मतदान केंद्रावर १४०० ते १५०० एवढी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सदरील कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. १०८ ग्रामपंचायत स्तरावर एकूण ३५२ उमेदवारांपैकी ५० टक्के महिला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत.
सदरील निवडणूक कामाकरिता महसूल यंत्रणा परिपूर्ण सज्ज असून आजपावेतो विविध विषयावर प्रशिक्षण तसेच १५ मिटिंग आयोजित करण्यात आल्या असून सर्व कर्मचारी यांना मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपावेतो सर्व अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा किंवा अनुपस्थितीत न राहणेबाबत तहसीलदार हदगाव जीवराज डापकर यांनी निर्देश दिले आहेत.
सर्व जबाबदारी नायब तहसीलदार जी.डी.हराळे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती स्नेहलता स्वामी, डी.एन.जाधव, विजय येरावाड तसेच लिपिक वैभव घोडे, श्रीमती कदम व सर्व कर्मचारी निवडणूक कामाकरिता सज्ज आहेत. सदरची माहिती मीडिया प्रमुख संजय गोडबोले तसेच विशाल शेवाळकर महसूल तसेच प्रीती माने (विस्ताराधिकारी), माधुरी दळनकर यांनी प्रसार माध्यमांना पुरविली आहे.