‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन अन् ऑफलाईनही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:02+5:302021-07-26T04:18:02+5:30

विद्यापीठ अनुदान आयोग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कार्यक्षेत्रातील चारही जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मान्यतेने या परीक्षा ऑनलाईन ...

Swaratim University exams will now be online and offline | ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन अन् ऑफलाईनही होणार

‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन अन् ऑफलाईनही होणार

विद्यापीठ अनुदान आयोग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कार्यक्षेत्रातील चारही जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मान्यतेने या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी २८ जुलैपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईनचे संमतीपत्र महाविद्यालयात सादर करावेत. विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एकच पर्याय निवडता येईल. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रावर परीक्षा घेताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र, राज्य, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल.

विद्यापीठातील सर्व संकुले व उपकेंद्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कोणताही बदल झालेला नाही. त्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार क्‍लस्टर पद्धतीने पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र ३१ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह स्वीकारण्यात येतील. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत त्या परीक्षांचे आवेदनपत्र विलंब शुल्कासह २८ जुलैपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र-संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.

चाैकट....

बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी व इतर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष वगळून क्लस्टर पद्धतीच्या परीक्षापूर्वी २६ जुलै, ते १० ऑगस्ट दरम्यान होणार होत्या. त्या आता सुधारित वेळापत्रकानुसार १७ ते २७ ऑगस्ट, दरम्यान होणार आहेत. पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ५ ऑगस्टपासून सुरू होतील. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून घेण्यात येतील. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या तारखेत बदल झालेला नाही. त्या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच २ ते १० ऑगस्टदरम्यान होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा ५ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी व इतर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून क्लस्टर पद्धतीच्या परीक्षा पूर्वी २६ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणार होत्या. त्या आता सुधारित वेळापत्रकानुसार १७ ते २७ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ५ ऑगस्टपासून सुरू होतील. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून घेण्यात येतील. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या तारखेत बदल झालेला नाही. त्या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच २ ते १० ऑगस्टदरम्यान होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष वगळून इतर वर्षाच्या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा ५ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

Web Title: Swaratim University exams will now be online and offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.