पोलीस अधीक्षकांचा कर्मचाऱ्यांना सुखद धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:01 IST2019-01-30T01:01:16+5:302019-01-30T01:01:40+5:30
पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का देत चित्रपटाची मेजवाणी दिली़

पोलीस अधीक्षकांचा कर्मचाऱ्यांना सुखद धक्का
नांदेड : पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का देत चित्रपटाची मेजवाणी दिली़
सण-उत्सव, आंदोलने यासह राजकीय कार्यक्रमांमुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे़ त्यातून कुटुंबाला किंवा स्वत:ला वेळ देणे ही अवघड बाब़ त्यातून कर्मचारी, अधिकाºयांना मानसिक नैराश्य येते़ त्याचा कामावरही परिणाम होतो़ त्यामुळे कर्मचारी, अधिकाºयांवरील मानसिक ताण दूर करुन त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक जाधव यांनी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे़ सोमवारी सकाळी मुख्यालय व इतर पोलीस ठाण्यांच्या कर्मचाºयांना बंदोबस्त असल्याचे सांगून पोलीस अधीक्षकांनी बोलावून घेतले़ त्यामुळे कर्मचारी धावतपळत आले़ आता काय नवीन बंदोबस्त ? यामुळे अनेकांचा हिरमोडही झाला़ परंतु, या सर्व कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक जाधव यांनी ‘चला चित्रपट पहायला’ असे म्हणताच त्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला़ पोलीस अधीक्षक जाधव यांनी कौठा भागातील पीव्हीआर थिएटर गाठले़
या ठिकाणी सर्व कर्मचा-यांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा दाखविण्यात आला़ पोलीस अधीक्षकांच्या या सुखद धक्क्यामुळे कर्मचाºयांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता़
शिस्तीच्या समजल्या जाणा-या पोलीस दलात नेहमी वरिष्ठांच्या धाकात असलेल्या कर्मचाºयांसाठी पोलीस अधीक्षकांनी उचललेल्या या पावलाचे पोलीस दलात कौतुक होत आहे़