आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST2020-12-05T04:29:15+5:302020-12-05T04:29:15+5:30

नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील संदीप दादाराव वानखेडे हा तरुण ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ट्रॅक्टरसाठी त्याने खाजगी ...

Suicide of a young man due to financial hardship | आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या

नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील संदीप दादाराव वानखेडे हा तरुण ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ट्रॅक्टरसाठी त्याने खाजगी कंपनीचे फायनान्स घेतले होते. मात्र, आर्थिक व्यवहारात जुळवाजुळव होत नव्हती. याचा त्याच्यावर तणाव होता. याच तणावातून ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता स्वत:च्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात, आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

(मयत पासपोर्ट फोटो क्रमांक - ०४एनपीएच डीईसी-०९ जेपीजी)

Web Title: Suicide of a young man due to financial hardship