शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून दाम्पत्याने संपवले जीवन; शिक्षकासह त्याच्या पत्नी, मुलीविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 16, 2024 16:19 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या, त्यानंतर पत्नीनेही संपवले जीवन

- मारोती चिलपिपरेकंधार : तालुक्यातील इमामवाडी येथे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पत्नीने देखील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पत्नीच्या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आरोपी शिक्षकासह त्याची पत्नी, मुलगी आणि मयत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामदास करेवाड (३५) आणि वर्षा रामदास करेवाड असे मयत पती-पत्नीची नावे आहेत.

तालुक्यातील इमामवाडी येथे रामदास हा आई, वडील, पत्नी, मुला-बाळांसह वास्तव्यास होते. रामदास हा कंधार येथे एका डॉक्टरकडे कंम्पाउंडर म्हणून काम करत होता तसेच ऑटो चालवून उदरनिर्वाह करीत होता. पत्नी वर्षा ही कंधार येथील जीएनएम कॉलेजमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीची ती उपाध्यक्ष होती. तर सुभाष कदम (रा. बामणी) हे याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या दोघांची ओळख झाली. त्यातच अधून-मधून वर्षांच्या घरी सुभाषचे येणे जाणे वाढले होते. 

दरम्यान, एक महिन्यापूर्वी रामदास यास सुभाष कदम यांची मुलगी शीतल हिने फोन केला होता. तू तुझ्या बायकोला सांभाळ, तिचे माझे वडील सुभाष कदम यांच्या सोबत अनैतिक प्रेम संबंध सुरू आहेत, असे सांगितले. रामदास यांनी घरी सांगितल्याने नातेवाईकांनी सून वर्षा व सुभाष कदम यांना समज दिली होती. परंतु त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे रामदास सतत तणावाखाली राहत होता. त्यातच सुभाष कदम यांची बायको लता कदम व मुलगी शीतल कदम हे देखील रामदास यास वारंवार मानसिक त्रास देत. तुझ्या बायकोला निट सांभाळ, नाहीतर तिला खतम करुन टाकू, अशी धमकी देत असल्याने रामदास हा तणावात होता. शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तर पत्नी वर्षा करेवाड हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

याप्रकरणी मयत रामदास करेवाड याची आई सुमनबाई सोपान करेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष रामराव कदम, वर्षा रामदास करेवाड (मयत), लता सुभाष कदम, शीतल सुभाष कदम यांच्या विरोधात कंधार पोलिस ठाण्यात १६ एप्रिल रोजी रात्री १२ च्या नंतर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनेश मुळे तपास करीत आहेत. आरोपीला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी कंधार पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

मृत्यूपूर्वी चिठ्ठी व्हॉटसॲपवर...रामदास करेवाड याने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्याच्या जीवितास काही बरेवाईट झाले तर त्यास सुभाष कदम सर व त्याची बायको वर्षा माणिका बोराळे ही जबाबदार राहील, असे लिहिलेले आहे. तसेच ती चिठ्ठी त्याने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर फॅमिली ग्रुप तयार करुन त्यावर टाकली होती.

मृताच्या आईने सांगितला घटनाक्रममाझा मुलगा ऑटो चालून संसाराचा गाडा चालवीत होता. गावातील जिल्हा परिषद शाळेवर असलेले सुभाष कदम नावाचे शिक्षक माझ्या सुनबाईला शालेय समितीवर जवळपास दोन वर्षापासून घेतले होते. त्यामुळे माझ्या सुनबाईचे शाळेवर तर शिक्षकाचे घरी येणे जाणे वाढले होते. माझी सुनबाई कंधार येथील बाळंतवाडी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. या शिक्षकांनी तिला शाळेवर नेऊन सोडल्याची माझ्या मुलांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण वाढत गेले. आणि या शिक्षकाचे असलेल्या अनैतिक संबंधामुळे माझ्या मुलाने आपले जीवन संपविले. मयत मुलाची आई सुमनबाई करेवाड असे लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी