तुपदाळ येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: March 19, 2023 18:37 IST2023-03-19T18:36:50+5:302023-03-19T18:37:29+5:30
मुखेड (जि. नांदेड ) : तालुक्यातील जाहूर मंडळ अंतर्गत असलेल्या तुपदाळ खुर्द येथील कर्जबाजारी शेतकरी माधव जळबा घाटे (वय ...

तुपदाळ येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मुखेड (जि. नांदेड) : तालुक्यातील जाहूर मंडळ अंतर्गत असलेल्या तुपदाळ खुर्द येथील कर्जबाजारी शेतकरी माधव जळबा घाटे (वय ५८) यांनी आत्महत्या केल्याची घटना १७ रोजी घडली.
माधव घाटे आपल्या शेतातील गोठ्यात १७ रोजी झोपण्यास गेले होते. मात्र, शनिवारी सकाळी शेतातील गोठ्यात गळफास घेतल्याचे आढळले. याबद्दल तलाठी भांगे यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयास कळवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सततच्या नापिकीमुळे व मुलींच्या विवाहासाठी खासगी कर्ज देणे असल्याने या शेतकऱ्याने शुक्रवारी मध्यरात्री शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आमहत्या केली.