लोह्यात विवाहीतेची दोन वर्षाच्या मूलासह विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:51 IST2018-02-16T19:48:06+5:302018-02-16T19:51:19+5:30

काही काळापासून माहेरी राहत असलेल्या विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या केली

Suicide by married women with two years old son in Loha | लोह्यात विवाहीतेची दोन वर्षाच्या मूलासह विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या

लोह्यात विवाहीतेची दोन वर्षाच्या मूलासह विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या

लोहा (नांदेड ) : काही काळापासून माहेरी राहत असलेल्या विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या केली.  ही घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

जुना लोहा येथे राहणारे लक्ष्मण चव्हाण यांची विवाहित मुलगी दिपाली विजय कटके ही मागील काही काळापासून माहेरी राहत होती. दीपालीला एक सहा वर्षाची मुलगी तर दूसरा सार्थक नावाचा दोन वर्षाचा मुलगा होता. बुधवारी दिपाली आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्यासह काही न सांगता घराबाहेर पडली. यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता ती आढळून आली नाही. 

दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जुना लोहा भागाला पाणी पुरवठा करणा-या नगर पालिकेच्या बडेसाब विहीरित महिलेचे प्रेत तरंगत आसल्याची वार्ता शहरात वा-या सारखी पसरली. यानंतर नागरिक व पोलिसांनी मृत महिला व बालकाचे प्रेत बाहेर काढले. याच दरम्यान दीपालीचे नातेवाईक तिथे पोहचले असता त्यांनी मृतदेह दीपालीचा असल्याचे सांगितले. आत्महत्यचे कारण अद्याप अस्पष्ट असून. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: Suicide by married women with two years old son in Loha