वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:45+5:302021-05-28T04:14:45+5:30
विष्णूपुरी परिसरातील मेडिकल कॉलेज भागात एका झाडाला उमरी तालुक्यातील कुदळा येथील राजेंद्र गंगाधर बेरजे या २७ वर्षीय तरुणाने गळफास ...

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
विष्णूपुरी परिसरातील मेडिकल कॉलेज भागात एका झाडाला उमरी तालुक्यातील कुदळा येथील राजेंद्र गंगाधर बेरजे या २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गंगाधर बेरजे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
अन्य एका घटनेत हदगाव तालुक्यातील कौठा येथे सचिन शिवाजीराव जाधव (२८) या तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी प्रभाकर जाधव यांनी माहिती दिली. या माहितीवरून हदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दोन्ही घटनांमध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
नांदेड : गावालगत असलेल्या एका खदाणीत पाणी भरण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी कंधार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कंधार तालुक्यातील बाळंतवाडी तांडा येथील सारिकाबाई गजानन जाधव ही महिला मंगळवारी गावालगत असलेल्या खदाणीवर पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेत असताना ती पाय घसरून खदाणीत पडली. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालाजी रामू राठोड यांच्या माहितीवरून कंधार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.