शहरातील नवी आबादी येथील ॲड. ईश्वर जोंधळे घरासमोर थांबलेले असताना मोहम्मद इरफान मोहम्मद रफिक व इतर दहा जणांनी जुन्या वादावरून जोंधळे यांचा मुलगा आणि पुतण्या यांना घेरून मारहाण सुरू केली. ही बाब जोंधळे यांच्या लक्षात आल्यानंतर भांडण सोडविण्यासाठी ते मध्ये पडले. यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. फुटलेल्या काचेच्या बाटलीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जोंधळे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला (दिल्लीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST