शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:06 IST

यावर्षी ८२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत २०२४-२५ या हंगामात साखर कारखान्यांकडे २ लाख १० हजार ९९९ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंदणी झालेली आहे. असे असले तरी यंदा नांदेड विभागात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली असून, यावर्षी ८२ लाख ४८ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. नवीन गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामासाठी नांदेड जिल्ह्यातून ३३ हजार ७३२ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातून २० हजार ७५६ हेक्टर, परभणी ५४ हजार ४०४ हेक्टर तर लातूर जिल्ह्यातून १ लाख २ हजार १०५ हेक्टर उसाचे क्षेत्र कारखान्यांकडे नोंदणी केलेले आहे. तर कृषी विभागाने १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र अंदाजित केले आहे. असे असले तरी एकंदरीत उसाच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे.

अडीच लाख टन ऊस हिंगोलीतील कारखाने गाळप करणारनांदेड जिल्ह्यातील ऊस दरवर्षी हिंगोली जिल्ह्यात गाळपासाठी जातो. २०२४-२५ मध्ये साधारणता अडीच लाख मेट्रिक टन ऊस हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप करणार आहेत. तर लातूर जिल्ह्यातील कारखाने उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यातील २.८० लाख मे.टन गाळप करतील. तसेच परभणी जिल्ह्यातील कारखाने बीड व जालना जिल्ह्यातील ५ लाख मे.टन ऊस गाळप करीत असल्याने विभागातील एकूण गाळप ९०.८० मेट्रिक टन इतके होईल.

सरासरी उत्पादकता ६० ते ७० टनविभागात सरासरी उत्पादकता ६० ते ७० मेट्रिक टन इतकी आहे. त्यात नांदेड जिल्हा उत्पादकता ७० टन, हिंगोली ७० टन, परभणी ६० तर लातूर ६५ टन इतकी आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस