शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 20:37 IST

शाळा उघडली पण शिक्षकच नाहीत; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सीईओंच्या दालनासमोर ठिय्या

- सचिन मोहितेनांदेड :विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे भरावित यासह गणित, इंग्रजी विषयांना शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी मरखेल येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये जि.प. सीईओंच्या दालनासमोर ठिय्या मारला. चार तास उपाशीपोटी विद्यार्थी कार्यालयात बसले असताना प्रशासनाने साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेड शहरापासून १०० कि.मी, अंतरावर असलेल्या देगलूर तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकांच्या मागणीचा प्रश्न मागील वर्षीपासून रखडला आहे. मागच्या वर्षभरात जि.प. प्रशासनाला सातवेळा पत्र पाठवून शिक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील ४० विद्यार्थ्यांनी थेट नांदेड गाठले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. पाच तास विद्यार्थी उपाशीपोटी जि.प. सीईओंच्या कक्षासमोर बसले.

जि.प. सीईओ वर्षा ठाकूर या रजेवर होत्या, तसेच अतिरिक्त सीईओ हे व्ही.सी.मध्ये होते, शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षणाधिकारी किनवटमध्ये होत्या. इतर अधिकारी जि.प. कार्यालयात उपस्थित होते. मात्र एकाही अधिकाऱ्याने साधी विचारपूसही केली नाही. अखेर उपाशीपोटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास केळी आणि पाण्याच्या बॉटल आणून दिल्या. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश निघणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी ५:३० पर्यंत हे आंदोलन सुरूच होते.

विद्यार्थ्यांना दिली केळीउपाशीपोटी आलेल्या विद्यार्थ्यांची दखल जि.प. प्रशासनाने घेतली नाही. अखेर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनीच विद्यार्थ्यांना दुपारी केळी आणि पाणी उपलब्ध करून दिले.

इंग्रजी, गणितासह हवेत ८ शिक्षकदहावीपर्यंत शाळा असलेल्या मरखेल जि.प. शाळेत ५६० विद्यार्थी संख्या असून, १२ शिक्षक आहेत. विद्यार्थी संख्येनुसार इंग्रजी, गणित, मराठी, हिंदी या विषयासह आणखी ८ शिक्षकांची आवश्यकता असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेडStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा