शाळेत सुरू झाला विद्यार्थ्यांचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:09+5:302021-02-05T06:11:09+5:30

शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात ...

The students started chirping in the school | शाळेत सुरू झाला विद्यार्थ्यांचा किलबिलाट

शाळेत सुरू झाला विद्यार्थ्यांचा किलबिलाट

शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ९ हजार २७८ शाळा असून याठिकाणी ९ हजार २०० शिक्षक आहेत. एकुण २ लाख ४२ हजार १९ विद्यार्थ्यांपैकी ३३ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट- विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अतुट नात्याचे बंध ज्या ठिकाणी बांधले जातात ते ठिकाण म्हणजे शाळा. विद्यार्थी नसतील तर शाळेच्या इमारतींना काही अर्थ उरत नाही. आज जवळपास ११ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पाहून आमचे मन आनंदाने भरून आले. - सटवाजी माचनवार, मुख्याध्यापक, ब्राह्मणवाडा

चौकट- आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांचाही उत्साह दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व काळजी घेत असून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. - तुकाराम जाधव, मुख्याध्यापक, वडगाव ता. नांदेड.

चौकट- पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी मी अतूर होतो. शाळेत गेल्यानंतर वर्गमीत्रांच्या भेटी झाल्या. शिक्षकांनाही पाहून आनंद झाला. आम्ही आज खूप मज्जा केली. मात्र पहिल्या सारखे आम्हाला खेळता आले नाही. - आकाश कवडे, विद्यार्थी, नांदेड

चौकट- ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे कोरोनाची भिती दूर ठेवून शाळेत गेलो. मात्र पूर्वी सारखे वातावरण हाेण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. सध्या कोव्हीडचे सर्व नियम पाळून शाळेत जावे लागणार आहे. - ओंकार वाघमारे, विद्यार्थी, नांदेड

Web Title: The students started chirping in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.