डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याचा निषेधार्थ नांदेडात रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 13:12 IST2018-04-15T13:12:00+5:302018-04-15T13:12:00+5:30
एका ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली आहे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याचा निषेधार्थ नांदेडात रास्ता रोको
नांदेड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरानजीक असलेल्या विष्णुपुरी येथे रस्ता रोखण्यात आला आहे. एका ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर नांदेड रस्त्यावर वाहनांची मोठी रीघ लागली आहे.
विष्णुपुरी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनरवरील फोटोची अज्ञात व्यक्तीनी विटंबना केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करीत या घटनेचा निषेध केला तसेच विटंबना करणाऱ्या समाजकंठकाना अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी पोलीस दल दाखल झाले आहे.
मिरवणुकीत किरकोळ काराणातुन एका तरूणाची
औरंगाबाद : भीम जयंती मिरवणुकीत किरकोळ काराणातुन एका तरूणाची दोन भावानी भोसकून हत्या केली . क्रांती चौक जवळ शनिवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास ही हत्या झाली . आशिष संजय साळवे(वय २७ . ऱा रमानगर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव अशी संशयीत आरोपींची नावे आहेत .आरोपी फरार आहेत संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक केली .