नांदेड : कष्टाने पिकवलेला शेतीमाल विकण्यासाठी कारखान्याचे उंबरठे झिजवण्याची वेळ आल्यावर शेतकरी किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार अर्धापूर तालुक्यात समोर आला आहे. वेळेवर उसाची तोडणी न झाल्याने हतबल झालेल्या दरेगाव येथील गंगाधर भीमराव हंबर्डे या शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी आपल्या स्वतःच्या एक हेक्टरवरील उसाला आग लावून दिली.
नेमकी काय आहे व्यथा?हंबर्डे यांनी दरेगाव शिवारात वर्षभर मेहनत करून उसाची लागवड केली होती. फेब्रुवारी महिना संपत आला तरी उसाची तोडणी झाली नव्हती. आपला ऊस कारखान्याला जावा, यासाठी त्यांनी 'भाऊराव सहकारी साखर कारखाना' प्रशासनाकडे वारंवार फेऱ्या मारल्या. ऊसतोड टोळ्यांनाही वारंवार विनंती केली, मात्र त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली.
स्वप्नांची झाली राखउसाचा हंगाम संपत आला असूनही कारखाना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हंबर्डे प्रचंड नैराश्यात होते. शेवटी, मंगळवारी दुपारच्या सुमारास संतापाच्या भरात त्यांनी उभ्या पिकाला आग लावून दिली. बघता बघता वर्षभराची मेहनत आणि उदरनिर्वाहाचे साधन आगीच्या भक्षस्थानी पडले.
शेतकऱ्याने जगायचे कसे?"शेतीमालाला भाव मिळत नाही आणि तोडणीसाठी चपला झिजवाव्या लागतात, अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगायचे कसे?" असा आर्त सवाल हंबर्डे यांनी यावेळी उपस्थित केला. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून, साखर कारखान्यांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Web Summary : A farmer in Ardhapur, Nanded, frustrated by delayed sugarcane harvesting, set his one-hectare field on fire. Despite repeated requests to the sugar factory, no action was taken. The desperate act highlights the plight of sugarcane farmers facing unresponsive factory management, raising concerns about their livelihood and the factory's planning.
Web Summary : नांदेड के अर्धापुर में गन्ने की कटाई में देरी से निराश एक किसान ने अपने एक हेक्टेयर खेत में आग लगा दी। चीनी मिल से बार-बार अनुरोध के बावजूद कोई कार्रवाई नहीं हुई। इस निराशाजनक कृत्य ने गन्ना किसानों की दुर्दशा को उजागर किया, जो अनुत्तरदायी फैक्ट्री प्रबंधन का सामना कर रहे हैं, जिससे उनकी आजीविका और फैक्ट्री की योजना के बारे में चिंता बढ़ गई है।