धर्माबाद तालुक्यात सहा ठिकाणी २४ तास बैठे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:37 IST2019-06-01T00:36:46+5:302019-06-01T00:37:30+5:30

तालुक्यातील अवैध वाळू, गौण खनिज व इतर अवैध वाहतुकीवर आळा बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी धाडसत्र मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील पाटोदा (थ), कारेगाव, चोंडी, संगम, सिरसखोड, रोशनगाव व बाभळी फाटा या सहा ठिकाणी दिवस-रात्र बैठे पथकांची नेमणूक केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त छापून संबंधितांचे लक्ष वेधले.

Squad for 24 hours in six places in Dharmabad taluka | धर्माबाद तालुक्यात सहा ठिकाणी २४ तास बैठे पथक

धर्माबाद तालुक्यात सहा ठिकाणी २४ तास बैठे पथक

धर्माबाद : तालुक्यातील अवैध वाळू, गौण खनिज व इतर अवैध वाहतुकीवर आळा बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी धाडसत्र मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील पाटोदा (थ), कारेगाव, चोंडी, संगम, सिरसखोड, रोशनगाव व बाभळी फाटा या सहा ठिकाणी दिवस-रात्र बैठे पथकांची नेमणूक केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त छापून संबंधितांचे लक्ष वेधले.
धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी पात्र कोरडी पडली असून या संधीचा फायदा वाळू तस्करी रात्रीला घेत असुन रात्रीला २० ठिकाणाहून वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. संगम, आल्लुर, बेल्लुर (बु), बेल्लुर (खु), चिचोंली, रामपूर, रामेश्वर, सिरसखोड, रत्नाळी, बाभळी (बंधारा), शेळगाव, माष्टी, चोळाखा, चोंडी, दिग्रस, रोशनगाव, आटाळा, कारेगाव आदी नदी पात्रातून बेकायदेशीर रात्रीला वाळूचा उपसा केला जात आहे.
संगम, बेल्लुर, सिरसखोड, बाभळी (बंधारा), आटाळा या नदी पात्रात सहा-सहा फुट खोल खड्डे पडलेले आहेत. एवढेच नसून बिलोली तालुक्यातील माचनूर, गंजगाव व इतर ठिकाणी घाटावरून धर्माबाद मार्ग बिनारायॅल्टी, बोगस पावती ठेवून ओव्हररोड वाळूची तस्करी होत आहे़ त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली.
याच बरोबर तालुक्यातील संगम, मनुर, सिरसखोड, बेल्लुर मार्ग नायगाव (ध) व कंदकुर्ती आणि बाळापूर मार्ग तेलगंणा राज्यात वाळूची सर्रास विक्री होत आहे. बन्नाळी मार्ग तानूर व आटाळा, सालेगाव, पिपंळगाव मार्ग बेकायदेशीर रात्रीला वाळूची तस्करी होत असून वाळूला सोन्यासारखा भाव वाढला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेवून
उपविभागीय अधिकारी डॉ़ सचिन खल्लाळ यांनी दखल घेऊन सहा ठिकाणी २४ तास बैठे पथकची नेमणूक केली. एका पथकात एक तलाठी व दोन कर्मचारी असे ३० कर्मचारी पथकात आहेत.
सकाळी सहा ते सायंकाळपर्यंत एक पथक व दुसरे सायंकाळी सहा ते पहाटे सहापर्यंत असे २४ तास पथकाची नेमणूक केली आहे.

 

Web Title: Squad for 24 hours in six places in Dharmabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.