महाकुंभ मेळ्याला जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांसाठी विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:43 IST2025-01-14T16:42:21+5:302025-01-14T16:43:57+5:30
विशेष रेल्वे प्रयागराज चौकीमार्गे चालविण्यात येत आहे.

महाकुंभ मेळ्याला जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांसाठी विशेष रेल्वे
नांदेड : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज कुंभमेळ्याला जाण्याकरिता नांदेड-पाटणा-नांदेड आणि काचीगुडा-पाटणा-काचीगुडा नांदेड ही विशेष रेल्वे प्रयागराज चौकीमार्गे चालविण्यात येत आहे.
गाडी क्रमांक ०७७२१ नांदेड ते पाटणा ही विशेष गाडी नांदेड येथून २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, सटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापूरमार्गे पाटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७७२२ पाटणा ते नांदेड विशेष गाडी पाटणा येथून २४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे २६ जानेवारीला सकाळी ४:३० वाजता पोहोचेल. या गाडीत २२ डब्बे असतील. गाडी क्रमांक ०७७२५ काचीगुडा ते पाटणामार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून २५ जानेवारी रोजी दुपारी ४:४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापूरमार्गे पाटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७७२६ पाटणा ते काचीगुडामार्गे नांदेड ही विशेष गाडी पाटणा येथून २७ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी ७ वाजता पोहोचेल. या गाडीत २० डबे असतील.