शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी सोपानराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:44+5:302021-02-06T04:30:44+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठा सेवा संघासह अन्य ३३ कक्षांच्या वतीने नांदेडच्या सिडको परिसरातील शिवजन्मोत्सव समितीच्या ...

Sopanrao Patil as the Chairman of Shivjanmotsav Committee | शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी सोपानराव पाटील

शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी सोपानराव पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठा सेवा संघासह अन्य ३३ कक्षांच्या वतीने नांदेडच्या सिडको परिसरातील शिवजन्मोत्सव समितीच्या निवडीकरिता सोमवारी सिडकोतील ‘जिजाऊ’ सृष्टी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिडको-हडको भागातील शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त सहशिक्षक सोपानराव पाटील यांची, तर स्वागताध्यक्षपदी बापूसाहेब पाटील व सचिवपदी दिगांबर शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव जाधव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सोपानराव पांडे व जयवंत काळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाउपाध्यक्ष साहेबराव गाढे, जे.डी. कदम तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अनुक्रमे- दीपक भरकड व गजानन शिंदे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी त्र्यंबक कदम, ना.ही. उमाटे, सुभाष सूर्यवंशी, विश्वास हंबर्डे, डी.के. शिंदे, उद्धव ढगे, प्रा. विठ्ठल आढाव, गजानन पवार, शिवाजी हंबर्डे, संग्राम मोरे, दिलीप कदम, आनंदा कदम, साधू जोंधळे, अजय मोहिरे, शशिकांत गाढे, गोविंद मजरे, ब्रह्मानंद वडजे, बालाजी हिवराळे, बालाजी मोटरगे, वामन हंबिरे, रोहिदास कवाळे, ज्ञानेश्वर शिंदे, शेख कलीम, संजय गायकवाड व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Sopanrao Patil as the Chairman of Shivjanmotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.