शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तरुणीने १८ वर्ष पूर्ण होताच ८०० किमीवरील प्रियकराचे घर गाठले, मागोमाग पालकही आले आणि....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 19:02 IST

'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील.

हदगाव (नांदेड): अल्लड वयातील प्रेमाला पूर्णत्वास नेण्यासाठी एका तरुणीने वयाचे १८ वर्ष पूर्ण होताच तब्बल ८०० किमीचा प्रवास करून थेट प्रियकराचे घर गाठले (As young lady completed 18 years, she reached her lover's house by traveling 800 km). ठाणे ते नांदेड जिल्ह्यातील मनाठा असा प्रवास तरुणीने केल्याची घटना रविवारी पुढे आली. दरम्यान, माग काढत पाठीमागे आलेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांना कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी दोघेही सज्ञान असल्याचे सांगत समजूत काढली. अखेर मुलीच्या पालकांच्याशिवाय त्या तरुण-तरुणीचा विवाह पार पडला. 

'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील. पाचवर्षांपूर्वी ठाण्यात कामानिमित्त आल्यामुळे त्याची आणि तिची ओळख झाली. अल्लड वयात दोघांचेही प्रेम जुडले. मुलीच्या घरी याची भनक लागली. दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने त्यांनी या नात्यास विरोध केला. यामुळे दोघेही हतबल झाले. शिवाय मुलगी बालिक असल्याने पळून जाऊन लग्नाचा मार्गही बंद होता. दरम्यान, काही कारणास्तव तरुण घरी परतला. मात्र, दोघेही मोबाईलवरून संपर्कात होते. तरुणाने घरी येताच सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. बहिणीचे लग्न लावून दिले, घर बांधले. इकडे वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याने तरुणीने लग्नाचा आग्रह सुरु केला. दरम्यान, वडिलास अर्धांगवायूचा झटका आल्याने तरुण थोडा विचलित झाला. मात्र, लग्नावर ठाम असलेल्या मुलीने १८ नोव्हेंबरला ठाणे स्टेशन गाठून थेट नांदेड गाठले. येथून तालुक्यातील मनाठा गावी ती आली. 

पोलिसांची साथ, बंधने झुगारून आले एकत्र मुलगी घरातून निघून गेल्याने पालकांनी ठाणे येथील पोलीसात तक्रार दिली. तपासात मोबाईल लोकेशन मनाठा दाखवत असल्याने पालकांनी मुली पाठोपाठ मनाठा गाठले. स्थानिक पोलिसांनी मुलीच्या पालकांनी घटनेची माहिती दिली. यावरून सपोनि विनोद चव्हाण यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. यावेळी दोघांनीही वयाची पुरावे सादर केली. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांनी कारवाईची मागणी करणाऱ्या मुलीची पालकाची समजूत काढली. पोलिसांनी सहकार्याचा सल्ला दिल्याने मुलीने परजातीचा मुलगा निवडला, खेड्यातील मुलासाठी घर सोडले, असा त्रागा करत पालकांनी तेथून काढता पाय घेतला. अखेर जातीपातीच्या,गरीब-श्रीमंत, शहर-खेडे अशा अनेक जुन्या विचारांच्या भिंती तोडून ते दोघे विवाह बंधनात अडकले. 

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस