शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सोडीप्रकरणी मनपात सर्वांचीच झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:50 IST

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली असून या निर्णयामुळे आता महापालिकेत विविध पदावर शिफारस करायचा जिल्हाध्यक्षांचा अधिकारच संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांच्या अधिकारावर कु-हाड

नांदेड : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याचा महापौरांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली असून या निर्णयामुळे आता महापालिकेत विविध पदावर शिफारस करायचा जिल्हाध्यक्षांचा अधिकारच संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे.आॅक्टोबर २०१८ मध्ये नांदेड महापालिकेच्या सार्वत्रितक निवडणुका झाल्या. या निवडणुकात काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविताना ७३ जागा जिंकल्या तर दुसरा मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी ठरला. भाजपाने ६ जागा जिंकल्या. मनपातील दुसरा मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे आले. या पदावर गुरप्रितकौर सोडी यांची निवड करण्याबाबतची शिफारस भाजपचे शहर महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे केली. या निवडीला प्रारंभीच भाजपाच्या इतर पाच नगरसेवकांनी आक्षेप घेतला. परिणामी जवळपास ११ महिने विरोधी पक्षनेते पदाची निवड रखडली होती. अखेर महापौर शीला भवरे यांनी सदर निवडीची प्रक्रिया सर्वसाधारण सभेपुढे ठेवली. सर्वसाधारण सभेत भाजपाच्या गुरप्रितकौर सोडी यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केली. या निवडी विरोधात भाजपच्याच अन्य पाच सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या पाच नगरसेवकांनी गटनेता म्हणून दीपकसिंह रावत यांची निवड करत त्यांनाच विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता द्यावी, असा प्रस्ताव महापौरांकडे दिला होता. मात्र महापौरांनी सोडी यांची निवड केल्याचे याचिकेत म्हटले. याचिकेवर १ मार्च रोजी निर्णय देताना महापौरांनी घेतलेला निर्णय रद्द ठरवला आहे. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी १५ दिवसाची मुदतही दिली आहे.विरोधी पक्षनेत्यांची निवड करण्याचा अधिकार हा महापौरांना आहे. महापौर हा निर्णय घेण्यास स्वतंत्र असताना विद्यमान महापौर शीला भवरे यांनी सदर विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवला. या कृतीवरही न्यायालयाने आक्षेप घेतला. त्याचवेळी महापौरांनी सोडी यांची केलेली निवड रद्दबातल ठरवली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी यांनी सदर प्रकरणात पक्षाचा जो आदेश असेल ती भूमिका घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे तर प्रशासकीय पातळीवर या आदेशानंतर आतापर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.भाजपा नगरसेवकांतील वाद चव्हाट्यावरया सर्व प्रकरणात भाजपातील अंतर्गत गटबाजी स्पष्ट झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा वाद वर्षभर प्रलंबित राहिला. त्यानंतर न्यायालयातही भाजपच्याच नगरसेवकांनी धाव घेतली. त्यावेळी तोडगा काढण्यासाठी मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सहा नगरसेवकांची बैठकही झाली. मात्र तोडगा निघालाच नाही. विशेष म्हणजे, संघटनमंत्री देशमुख हे रविवारी नांदेडमध्ये येत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपा