महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:22+5:302021-02-06T04:31:22+5:30

कुशावाडी येथे घर फोडले देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे घर फोडून चोरट्यांनी १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना ...

Snatched the knot from the woman's neck | महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकाविले

महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकाविले

कुशावाडी येथे घर फोडले

देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे घर फोडून चोरट्यांनी १९ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली. माधव व्यंकटराव जाधव हे घरातील ओसरीत झोपलेले असताना चोरटा आत आला. यावेळी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २ हजार रुपये असा एकूण १९ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मगनपुरा भागातून ऑटो केला लंपास

शहरातील मगनपूरा भागात घरासमोर उभा असलेला ऑटो लंपास करण्यात आला. ही घटना ११ जानेवारी रोजी घडली. रामकृष्ण बळीराम भेंडे यांनी एम.एच.२८, एबी ४७२० या क्रमांकाचा ऑटो घरासमोर उभा केला होता. दोन लाख रुपये किमतीचा हा ऑटो लंपास करण्यात आला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुगाचे पोते चोरताना पकडले

नांदेड : देगलूर शहरातील कुंभारगल्ली भागात मुगाचे पोते चोरून नेताना एकाला नागरिकांना पकडले. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. पिंटरान कोरपलवार यांच्या घरात ठेवलेले २५ किलो वजनाचे मुगाचे पोते चोरून नेत असताना आरोपीला नागरीकांनी पकडले. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दावणगीर येथे गोठ्यातील म्हैस चोरीला

देगलूर तालुक्यातील मौजे दावणगीर येथे गोठ्यात बांधलेली ४० हजार रुपये किमतीची म्हैस चोरट्याने सोडून नेली. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणात राजाबाई रामचंद्र गंगलवाड यांच्या तक्रारीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Snatched the knot from the woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.