शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

चंदनाची नांदेडमार्गे तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:27 IST

वसमत तालुक्यातील पांगरा येथून महिंद्र पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़

ठळक मुद्देस्थागुशाची कामगिरी ४६० किलो चंदन केले जप्त

नांदेड : वसमत तालुक्यातील पांगरा येथून महिंद्र पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़ चंदासिंग कॉर्नरपासून सिनेस्टाईल या वाहनाचा पाठलाग करीत पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४६० किलो चंदन जप्त केले आहे़ या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़हिंगोली जिल्ह्यातील पांगरा येथून चंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नियुक्त करण्यात आले होते़ यातील एक पथक भोकर फाटा आणि दुसरे चंदासिंग कॉर्नर येथे थांबले होते़ पांगरा येथून निघालेला महिंद्र पीक अप (क्र.के़ए़-१८,८५०१) हा मालेगावमार्गे नांदेड शहरात आला़ त्यानंतर नांदेड शहरातून तो चंदासिंग कॉर्नरमार्गे हैद्राबादकडे जात असल्याची कुणकुण स्थागुशाच्या पथकाला लागली़मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पथकाने मारतळ्यापर्यंत या वाहनाचा पाठलाग करुन त्यांना पकडले़ पोलिसांनी पीकअप वाहनाची तपासणी केली असता, खालच्या बाजूने कप्पा करुन त्यामध्ये चंदन असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी वाहनातील ४६० किलो चंदन जप्त केले़ तर कुरुंदा येथील शेख अली शेख खॉजा व चालक मोहम्मद खुनी मोहम्मद सोफी या दोघांना अटक केली आहे़ या प्रकरणात एकूण तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़हे आरोपी आंतरराज्यीय असून इतर आरोपींच्या शोधासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे़पोनि़सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि कल्याण नेहरकर, शहादेव खेडकर, दशरथ जांभळीकर, सुनील गटलेवार, पोतदार, गजानन बयनवाड, मंगेश जोंधळे, शैलेश बुडगुलवाड, बजरंग बोडके, व्यंकट गंगुलवार, श्रीरामे यांनी ही कारवाई केली़

  • वसमतहून निघालेली महिंद्रा पीकअप प्रथमदर्शनी रिकामीच दिसत होती़ परंतु, या वाहनाच्या खालच्या बाजूने चंदन तस्करीसाठी कप्पा करण्यात आला होता़ या कप्प्यात तब्बल ४६० किलो चंदन घेवून जात होते़ पोलिसांनी वाहनाला अडविल्यानंतर सुरुवातीला ते रिकामेच दिसले़ कसून तपासणी केल्यानंतर लपविलेले चंदन पोलिसांच्या हाती लागले़
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस