शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परीक्षेचे ढिसाळ नियोजन; तब्बल साडेचार तासांनी ओपन झाली ऑनलाईन लिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 14:42 IST

साडेअकरा वाजताची परीक्षा चार वाजेपर्यंत सुरूच नाही

ठळक मुद्दे‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रकार पदवी, पदव्युत्तर परीक्षेचा गोंधळ 

नांदेड :  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या उन्हाळी परीक्षांना  १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी साडेआकरा वाजता सुरु होणारी परीक्षा दुपारी ४ वाजेपर्यंत आॅनलाईन लिंक ओपन न झाल्यामुळे सुरूच झाली नाही. 

स्वारातीम विद्यापीठांतर्गत साधारणपणे दीडशे  केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत़   २०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील बीए, बीएस्सी, बीकॉम या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राचे १५ हजाराहून अधिक विद्यार्थी  परीक्षा देत आहेत़   याशिवाय इतर विविध अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राचे जवळपास ३० हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 

१५ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारी परीक्षा आॅनलाईन प्रश्नपत्रिका प्राप्त न झाल्यामुळे वेळेवर सुरू करता आली नाही़  त्यामुळे परीक्षार्थींना दोन, तीन तास ताटकळत बसावे लागले़  अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यामुळे परीक्षेपासून  वंचित राहावे लागले़  परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सकाळी  साडेअकरापासून दुपारी २ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका मिळाली नाही. शेवटी दुपारी चार वाजता लिंक ओपन झाल्याचा संदेश मिळाला. 

आजची परीक्षा पुढे ढकललीविद्यापीठाच्या आॅनलाईन व आॅफलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणीमुळे  अनेकांना पेपर  देता आला  नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी सकाळी साडेआकरा वाजता संबंधित परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे १७ आॅक्टोबर रोजीचे नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा पेपर २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

नेटकॅफेवर थकलोशुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पेपर होता़  मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिकाच उपलब्ध झाली नाही.  नेटकॅफेवर जाऊन चेक  केले. मात्र, उपयोग झाला नाही़  गुरुवारीही असेच झाले़, असे धर्माबाद तालुक्यातील बीजेचा विद्यार्थी अवंदास वाघमारे याने सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणNandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड