धानोरा येथे ओसरीत झोपलेले कुटुंब बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:57 IST2018-06-07T00:57:26+5:302018-06-07T00:57:26+5:30
तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवितहानी टळली. तर दुसऱ्या घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकqयाचे नुकसान झाले.

धानोरा येथे ओसरीत झोपलेले कुटुंब बालंबाल बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसात घर पडून नुकसान झाले. यावेळी घरातील सदस्य ओसरीत झोपल्याने मोठी जीवितहानी टळली. तर दुसऱ्या घटनेत शेतात बांधकाम होत असलेल्या विहिरीचे कठडे ढासळून शेतकqयाचे नुकसान झाले.
तालुक्यात सतत दोन दिवसांपासून रात्रीला होत असलेल्या पावसाने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असले तरी मान्सूनपूर्व वादळी वारे व मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड होवून विद्युत खांब व झाडे आडवी पडून नुकसान होत आहे. यातच मंगळवारी रात्री ८.३० वाजता तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. यात धानोरा येथील शेतकरी पांडुरंग ग्यानोबा कुरुकवाड यांचे कौलारु घर कोसळले. यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे कुरुकवाड कुटुंबातील पती, पत्नी, वडील व ६ वर्षांचा मुलगा ओसरीत झोपले असल्यामुळे जीवितहानी टळली.
तर भगवान धगरे यांच्या शेतातील विहिरीचे चालू असलेले बांधकाम ढासळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच तलाठी शीतल तरटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
तालुक्यात मंडळनिहाय मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस- भोकर - ४० (४४) मि.मी. मोघाळी - ६५ (१८१) मि.मी., मातुळ - ०० (२०) मि.मी., किनी - ०० (३४) मि.मी. अशाप्रकारे तालुक्यात एकूण १०५ (३१९) मि.मी. तर मंगळवारी रात्री सरासरी पाऊस - २६.२५ मि.मी. होवून आतापर्यंत सरासरी ७९.७५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अतिवृष्टी झालेल्या मोघाळी मंडळातील मोघाळी, धारजनी शिवारात बुधवारी शेतकºयांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.