ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:06+5:302020-12-29T04:17:06+5:30

तालुक्यातील बोरजुनी, ईळेगाव, बितनाळ व वाघाळा या चार गावातून ...

Six applications filed for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

तालुक्यातील बोरजुनी, ईळेगाव, बितनाळ व वाघाळा या चार गावातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी सर्व ५७ ग्रामपंचायती मधील उमेदवारी अर्ज दाखल होतील. सर्व्हर डाऊन असल्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी बराच वेळ लागतो आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया विलंबाने होत आहे. उमरी तालुक्यात पूर्ण ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध होत नसल्या तरी काही वार्डमध्ये बिनविरोध निवडणूका होत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काही ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड करण्याच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नेते प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

उमरीत पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय

उमरी : शहराच्या मुख्य रस्त्यावरील तसेच गल्लीबोळातील पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून चो-यांचे प्रमाण वाढल्यामुळे नियमितपणे पथदिवे चालू असणे आवश्यक बनले आहे. मोंढा मार्केटसह व्यंकटेशनगर, गणेश नगर, इस्लामपूरा, जुनागाव आदी भागातील पथदिवे बंद असल्याची तक्रार नागरीकांतून होत आहे.

Web Title: Six applications filed for Gram Panchayat elections