शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

साहेब... आईच्या अंत्यविधीसाठी पैशाची मदत करता का? दरोडेखोरांनी उद्‌ध्वस्त केला गरिबाचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:45 IST

Nanded News: दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वयोवृध्द आईवडिलांवर उपचार  करण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठीही पैसे नसल्याने इतरांकडे हात पसरण्याची वेळ मुलावर आली आहे.

लोहा (जि. नांदेड) - लांडगेवाडी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वयोवृध्द आईवडिलांवर उपचार  करण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठीही पैसे नसल्याने इतरांकडे हात पसरण्याची वेळ मुलावर आली आहे. दरोडेखोरांच्या हाती किडुक मिडुक लागले असले तरी त्यासाठी कुटुंबातील महिलेला जीव गमवावा लागला आहे. ज्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य असताना त्याच्या घरावर दरोडा टाकून काय मिळणार याची पुसटशी कल्पनाही दरोडेखोरांना कशी आली नसेल किंवा दयामयाही कशी आली नसेल असा प्रश्न पडतो.

लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे माजी सरपंच सोनबा लांडगे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या गणेश चव्हाण यांच्या घरी २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. दरोेडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या आई-वडिलांवर उपचार करण्यासाठी गणेश यांनी अनेक राजकीय लोकांकडे हात पसरले परंतु नकारघंटा मिळाल्याने आईवडिलांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.  

मदतीसाठी अनेक पुढाऱ्यांकडे पसरले हात- शुक्रवारी दुपारी आई विमलबाई चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यानंतर  मुलगा गणेश यांनी लोहा-कंधार, मुखेड मतदारसंघातील काही पुढाऱ्यांना अंत्यविधीसाठी आर्थिक मदतीची मागणी केली.- मात्र, पुढाऱ्यांनी त्या कुटुंबावर काही सहानुभूती मात्र दाखवली नसल्याचे मुलगा गणेश यांनी सांगितले.- विमलबाई चव्हाण यांच्या पश्चात सात मुली, दोन मुले, एक सून, नातवंडे असा परिवार असून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

चोरटे अजूनही मोकाट !लांडगेवाडी परिसरातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस अधीक्षक कृष्ण कोकाटे, सहायक पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, माळाकोळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप निलपत्रेवार हे दाखल झाले होते. घटनेला पाच दिवस झाले तरी चोरट्यांचा पत्ता अजूनही लागला नाही.

टॅग्स :NandedनांदेडRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी