शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:10 IST

नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

- श्रीनिवास भोसलेनांदेड : राज्यातील राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेसेना सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र येत युतीचा नारा दिला, तर पुण्यात काका - पुतण्यांची जवळीक वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. स्थानिक नेत्यांचे मतभेद असूनही नेत्यांच्या आदेशानुसार भाजप - शिंदेसेना एकत्र लढेल, असे चित्र आहे.

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, भाजपने सर्वाधिक जोर लावला आहे. त्यापाठोपाठ सत्ताधारी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तयारीत असून, खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसही विरोधकांशी दोन हात करण्यास सज्ज आहे. सध्या सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करत असले तरी आगामी काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते.

राज्य पातळीवर झालेल्या निर्णयानुसार स्थानिक नेत्यांची इच्छा नसतानाही भाजप आणि शिंदेसेना नांदेडमध्ये एकत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षांतील नेत्यांचे स्थानिक स्तरावर फारसे जुळत नसले, तरी निवडणूक रणनीती म्हणून तडजोडीची भूमिका घेतली जाऊ शकते. तसे झाल्यास जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. विशेषतः मुस्लीम आणि दलितबहुल मतदार असलेल्या २२ ते २५ जागांवर कोण उमेदवार देणार, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फारसे प्राबल्य नसले, तरी राज ठाकरे यांना मानणारा एक गट आहे. हा गट उद्धव ठाकरे यांच्या सेनेसह एकत्र येऊ शकतो. राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार, हे उमेदवारी अर्ज उचलण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

महायुतीचे नेते एकमेकांच्या संपर्कातशिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिक संपर्कात आहेत. मात्र, त्याचवेळी हेमंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे 'जुने मैत्रिपूर्ण' संबंधही पुन्हा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे - मुंबई विमान प्रवासादरम्यान उभय नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे भाजप - शिंदेसेना पुन्हा एकत्र आल्यास सत्ताधारी मित्रपक्ष म्हणून नवे राजकीय गणित जुळल्यास आश्चर्य वाटू नये.

काका-पुतण्यांची जवळीक आणि पर्यायी आघाड्याशरदचंद्र पवार आणि अजित पवार हे काका - पुतणे पुण्यात एकत्र आले, तर राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ला महायुतीबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी परंपरागत काँग्रेससोबत हातमिळवणी करून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करू शकते. यामुळे मुस्लीम आणि दलित मतांचे ध्रुवीकरण टाळणे सोपे होईल. याच दिशेने पहिले पाऊल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान पडल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी घेतलेली ॲड. आंबेडकरांची भेट ही संभाव्य राजकीय हालचालींचा भाग मानली जात आहे.

अशोकराव चव्हाणांची खेळी पुन्हा रंगणार?नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण यांनी खेळलेली रणनीती यशस्वी ठरली होती. तसेच सर्वच पक्षांचे गणित बिघडवत २०१७मध्ये त्यांनी महापालिकेत ७३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाही वेगळ्या आघाडी किंवा पक्षाच्या माध्यमातून तसाच प्रयोग केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ११ माजी नगरसेवकांनी अचानक एमआयएममध्ये प्रवेश करणे, हे त्याच डावपेचाचे संकेत मानले जात आहेत. हिंदूबहुल भागात भाजप - शिंदेसेनेची सरशी मानली जात असली, तरी मुस्लीम आणि दलित मतदार असलेल्या जवळपास २२ ते २५ जागांवर कोण बाजी मारतो, यावर महापालिकेतील सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या जागांवरील उमेदवार निवड आणि आघाडीचे गणित निर्णायक ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Political winds shift; BJP-Shinde Sena alliance inevitable despite local disputes.

Web Summary : Nanded's political landscape anticipates a BJP-Shinde Sena alliance for municipal elections, despite local leader disagreements. Parallel talks of alliances between Thackeray brothers and Pawar relatives fuel speculation. Focus is on seat sharing, especially in Muslim/Dalit dominated areas. Ashok Chavan's strategies add complexity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना