सख्खे झाले पक्के वैरी! घरगुती वादातून तिघा भावांनीच केला भावाचा दगडाने ठेचून खून
By श्रीनिवास भोसले | Updated: October 2, 2023 16:47 IST2023-10-02T16:46:47+5:302023-10-02T16:47:11+5:30
चौघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि एकाचा खून झाला.

सख्खे झाले पक्के वैरी! घरगुती वादातून तिघा भावांनीच केला भावाचा दगडाने ठेचून खून
नांदेड : सख्खा तीन भावांनी मिळून चौथ्या भावाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हडको परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. नरेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (वय३४) रा. हडको असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. घरगुती वादातून सख्या तीन भावांनी मिळून नरेंद्रचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील आरोपी आणि मयत देखील दारूच्या नशेत होते.
दरम्यान, चौघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि एकाचा खून झाला. आरोपींनी मयताच्या चेहरा दगडाने ठेचला आहे. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.