नांदेड : जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़मुखेडच्या गणेश मोबाईल शॉपीमधून चोरट्यांनी तीन मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ६१ हजार ८७५ रुपयांचा माल लंपास केला़ २३ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी शॉपीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता़ या प्रकरणी नागेश कोटगिरे यांच्या तक्रारीवरुन मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़दुसरी घटना किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे घडली़ अशोक पिका जाधव यांचे एकविरानगर येथे घर आहे़ चोरट्याने जाधव यांच्यासह अन्य एका घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला़ यावेळी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८५ हजारांचा ऐवज लंपास केला़ याप्रकरणी अशोक जाधव यांनी तक्रार दिली़तर तिसरी घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली़ विष्णूपुरी ग्रामीण पॉलिटेक्नीक कॉलेज परिसरातील रोहित रवींद्र माळगे हे आजीसह कार्यक्रमासाठी कर्नाटकमध्ये गेले होते़ त्यानंतर ते परत आल्यानंतर विष्णूनगर येथील आईकडे गेले़ त्याच दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करुन एटीएम कार्ड व ऐवज असा ४२ हजारांचा माल लंपास केला़ या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ मागील काही दिवसांत चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.
मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:43 IST
जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़
मुखेडमध्ये शॉपी तर गोकुंद्यात घरफोडी करुन ऐवज लंपास
ठळक मुद्देविष्णूपुरी परिसरातही चोरट्यांनी मारला डल्ला